MPSC Student Protest : MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! रोहित पवार, सुप्रिया सुळेंसह राज ठाकरेंची मोर्चात एन्ट्री; पुण्यात नेमकं काय घडतंय?

पुण्यात MPSC पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पेपरफुटी प्रकरणावर संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला आहे.

MPSC Student Protest : MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! रोहित पवार, सुप्रिया सुळेंसह राज ठाकरेंची मोर्चात एन्ट्री; पुण्यात नेमकं काय घडतंय?

पुण्यात MPSC पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पेपरफुटी प्रकरणावर संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. विद्यार्थी आक्रोश मोर्चामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. एमपीएससी पेपरफुटी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आक्रोश मोर्चात सामील झालेल्या मुलींची आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या आक्रोश मोर्चामध्ये राजकीय नेत्यांचा देखील सहभाग पाहायला मिळतो आहे.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सहभाग दर्शवला. तसेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे देखील विद्यार्थ्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. एमपीएससी अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घ्यावा ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

हेही वाचा- Uddhav Thackeray Shivsena : राऊतच नाही तर, शिवसेनेचे इतरही नगरसेवक अडचणीत? राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून परीक्षेतील गैरव्यवहार सातत्याने होणारी पेपर फुटी प्रकरण विरोधात विद्यार्थ्यांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालया वरती मोर्चा काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे Mpsc पेपर फुटी प्रकरणात आज सत्र न्यायालयात सुनावणी आहे. आरोपींना 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती.

त्यानंतर आज पोलिस कोठडीची मुदत संपली असून आरोपींना पुन्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. यामध्ये मयुर ठाकरे या आणखी एका आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे या मयुर ठाकरेंचा नेमका पेपर फुटीशी काय संबंध आहे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आंदोलनामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा समोर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number