रस्त्यावर दूध ओतून ‘रयत क्रांती’चं आंदोलन

राज्य सरकारने दूध खरेदीमध्ये वाढ केल्यानंतरही खाजगी दूध संघ चालकांनी दूध दरवाढ केली नसल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज पंढरपुरात रयत क्रांती संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. दूध दरवाढ करावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी आहे राज्य सरकारने प्रतिलिटर 34 रुपये दर जाहीर केला आहे तरीही खाजगी दूध […]

रस्त्यावर दूध ओतून ‘रयत क्रांती’चं आंदोलन

राज्य सरकारने दूध खरेदीमध्ये वाढ केल्यानंतरही खाजगी दूध संघ चालकांनी दूध दरवाढ केली नसल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज पंढरपुरात रयत क्रांती संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले.

दूध दरवाढ करावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी आहे राज्य सरकारने प्रतिलिटर 34 रुपये दर जाहीर केला आहे तरीही खाजगी दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ देण्यास टाळाटाळ करत आहेत खाजगी दूध संस्था चालकांचा निषेध म्हणून आज रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले आहे.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना २८, २९ रूपयेच्यावर दर मिळेना, राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे, म्हणून रयत क्रांती संघटना व दूध उत्पादक संघटनांनी आज दुध ओतून खाजगी व सहकारी दूध संचालकालच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी दीपक भोसले यांच्यासह अन्य दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number