वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सर्जिकल स्ट्राईकमुळे जगाला आमची ताकद कळली असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला पुन्हा ठणकावले.
अमेरिका दौऱ्यात मोदींनी पहिल्याच दिवशी व्हर्जिनियामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं म्हणत मोदींना पाकिस्तानला चिमटाही
काढला.
मोदी सरकारच्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नसल्याचंही त्यांनी ठासून सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.