रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाला मान देत ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 9 आणि 11 सप्टेंबर रोजी नियोजित असलेली ही विशेष रेल्वे आता 11 आणि 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून कोकणाच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती मत्स्य विकास व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. प्रवासासाठी इच्छुक चाकरमान्यांनी भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे कोकणात यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ धावणार आहे. या एक्सप्रेसच्या वेळापत्रकाची काहीच दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी घोषणा केली होती. पण आता या वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे. याआधी 9 आणि 11 सप्टेंबर रोजी धावणारी ‘मोदी एक्सप्रेस’आता 11 आणि 13 सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. सिधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांच्या आग्रहास्तव या तारखांमध्ये बदल जाहीर केला आहे. मुंबईतून निघाल्यानंतर रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि रत्नागिरी असे थांबे या ट्रेनला असणार आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय मानला जात आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ही विशेष ट्रेन सुटणार आहे. दरम्यान, या विशेष ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी चाकरमान्यांनी आपापल्या भागातील भाजप मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
मुंबईहून निघाल्यानंतर ही ट्रेन रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली असा प्रवास करत सावंतवाडी या तिच्या अंतिम मुक्कामावर पोहोचेल. या विशेष ट्रेनसाठी तिकीट बुकिंग प्रक्रिया २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. प्रवाशांनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षांकडे किंवा रत्नागिरीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आपली तिकिटे बूक करावीत, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.