वृत्तसंस्था, नवी दिल्ली
येत्या एक डिसेंबरपासून तुमचं मोबाइल सिमकार्ड आधार क्रमांकाला लिंक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची आवश्यकता नसेल. कारण घरबसल्या OTP अर्थात वन टाईम पासवर्ड किंवा फोनवरील IVR सर्विसद्वारे किंवा मोबाईल एपचाही वापर करून ग्राहकांना आपला मोबाइल आधार क्रमांकाशी सहज जोडता येणार आहे.
दूरसंचार मंत्रालयानं गेल्याच महिन्यात 3 पर्यायांचा उपयोग करून मोबाइल क्रमांकांची पुनर्तपासणी करण्यास मान्यता दिली होती.
या शिवाय दूरसंचार विभागानं बायोमेट्रिक पध्दतीनंही वयोवृद्ध ग्राहकांच्या घरी जाऊन मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्याला मान्यता दिलेली आहे. अशी माहिती‘UIDAI’चे CEO अजयभूषण पांडे यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.