जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
फेरीवाला अंदोलनानंतर मनसे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेय. यावेळी मनसेने कचरा प्रश्नावरुन नवी मुंबई महापालिकेला धाब्यावर धरलय.
ओला आणि सुका कचरा वर्गीकरण होत नसल्याचं सांगून नवी मुंबई महापालिका प्रशासनानं मंगळवारपासून घणसोली कॉलनीत कचरा उचलणं बंद केलय.
त्यामुळे सोसायट्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालय. या कॉलनीमध्ये 60 हजार पेक्षा जास्त नागरिक राहतात.
कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिका प्रशासनानं कचरा उचलणं बद केल असल्याचं स्थानिक रहिवाश्यांच म्हणणं आहे. त्यामुळे 24 तासात कचरा न उचलल्यास विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा मनसेने दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.