जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मालाडमध्ये झालेल्या फेरीवाला हटाव मोहिमेत मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे, नयन कदम घटनास्थळी गेले असता पोलिसांन त्यांना ताब्यात घेतलंय.
यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम हाती घेत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केलीय.
मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना मारहाण केलीय. यानंतर हा सर्व प्रकार घडलाय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी मालाडला जाणार आहेत. फेरीवाल्यांच्या मारहाणीत मालवदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.