जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे.
कुर्ला येथील शौचालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने सोमवारी कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप तुर्डे यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधितांनी तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर कुर्ला पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली.
नगरसेवक तुर्डेंना अटक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.