Raj Thackeray : अडीच तास वाट पाहणाऱ्या सुवर्णपदक विजेत्याची राज ठाकरेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले, दिलीप गावित आल्याचं कुणी कळवलंच नाही

नाशिक : सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे. यादरम्यान, काल गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना बोलावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडीच तास भेट दिली नसल्याचा दावा केला जात होता. मात्र दिलीप गावित भेटायला येणार आहेत, याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं […]

Raj Thackeray : अडीच तास वाट पाहणाऱ्या सुवर्णपदक विजेत्याची राज ठाकरेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले, दिलीप गावित आल्याचं कुणी कळवलंच नाही

नाशिक : सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे. यादरम्यान, काल गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना बोलावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडीच तास भेट दिली नसल्याचा दावा केला जात होता. मात्र दिलीप गावित भेटायला येणार आहेत, याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे. मात्र तरीही भेट होऊ न शकल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राज ठाकरे म्हणाले. नाशिक दौऱ्यावरील आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी याबाबत भाष्य केले.

हेही वाचा : Missing Link Accident: मिसिंग लिंकवर भीषण अपघात! फॉर्च्युनरची मालवाहू टेम्पोला जोरदार धडक; थरारक CCTV फुटेज समोर

राज ठाकरे म्हणाले की, "मी एका गोष्टीचा खुलासा करु इच्छितो, काल आपले एक खेळाडू दिलीप गावित येऊन गेले. मी बातम्या पाहिल्या. महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यांना कोणी बोलावलं हे मला माहिती नाही, ते आलेत, हेही मला कुणी सांगितलं नाही. त्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही, असं का करेन मी? मला माहितीच नसलेल्या गोष्टींवर बातम्या आल्या. त्यांचाही काही गैरसमज झाला, की ते दोन तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं, मला कुणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कुणी सांगितलं असतं, तर निश्चित मी त्यांना भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलावलं, मला कुणी सांगितलं का नाही, हा भाग बाजूला सोडा, पण भेट नाही झाली आणि त्याबद्दल ते नाराज झाले, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. ते दिल्लीला गेले आहेत. ते परत आल्यावर मी नक्कीच त्यांची भेट घेईन आणि या गोष्टी सांगेन. तुमचाही काही संपर्क झाला, तर त्यांच्या कानावर या गोष्टी घाला, की मलाच काही माहिती नव्हतं, त्यामुळे न भेटण्याचा काही विषयच येत नाही," असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number