जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या मराठी चित्रपट ‘म्होरक्या’चे निर्माते कल्याण पडाल यांनी सोलापुरात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. या आजाराला कटांळून त्यांनी आपले जीवन संपवले आहे.
आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेले पडाल यांना काविळदेखील झाला होता, आणि कर्करोग हा लास्ट स्टेजला होता, मात्र मिळालेल्या माहितीनुसार पडाल यांनी उपचारासाठी खासगी सावकाराडून पैसे घेतले होते, आणि याच सावकरी तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. असा त्यांच्या कुटुंबियाचा आरोप आहे.