मेट्रोमुळे मुंबईचे राजकारण तापणार

मेट्रोमुळे मुंबईचे राजकारण तापणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मेट्रोच्या कामासाठी होणा-या वृक्षतोडीवरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

कारण, मेट्रोकामांसाठी मुंबईभरात एकूण 3 हजार 181 झाडे तोडण्यात येणार आहेत. खरं तर मेट्रो कामांसाठी दिल्या जाणा-या वृक्षतोडीच्या परवानगीला स्थगीती देऊन न्यायालयानं पालिकेला दणका दिला असला तरी येत्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीत  मेट्रोकामांसाठी  जवळपास 1 हजार वृक्षांना कापण्याचे प्रस्ताव येणार आहेत.

अंधेरी आणि आरे कॉलनीमधील हे प्रस्ताव आहेत. तसेच मालवणी येते मेट्रो २ च्या डेपो व वर्कशॉपसाठी 500 झाडे तोडण्यात येणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version