Mumbai Local Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर सावधान! मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका

एकीकडे गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमण्यांची आणि मुंबई आणि उपनगरांमधील भक्तांची मोठी गर्दी होत आहे. अशातच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Mumbai Local Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर सावधान! मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका

एकीकडे गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमण्यांची आणि मुंबई आणि उपनगरांमधील भक्तांची मोठी गर्दी होत आहे. अशातच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक गणेश भक्तांसाठी अडचणीचा ठरणार आहे. ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गांसह ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी, नेरूळदरम्यान विविध अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेचे काम केली जाणार आहेत.

त्यामुळे रविवारी प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकात बदल आणि अतिरिक्त थांब्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसह सर्वच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. दरम्यान मेगाब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देत प्रवासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा- Weather Update : महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनासोबत पावसाचीही एन्ट्री! पावसाचा जोर पुन्हा वाढणार; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मध्य रेल्वे
कुठे : ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
परिणाम : सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध-जलद लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकलना कळव मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली आणि ठाकुर्ली येथेही थांबे देण्यात येतील. तर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद आणि अर्ध-जलद लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

गुजरात हार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकच्या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरूळदरम्यानची अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहणार आहे. ठाण्याहून वाशी, नेरूळ आणि पनवेल दिशेने सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन लोकल पनवेल, नेरूळ आणि वाशीहून ठाण्याच्या दिशेने सकाळी 10.25 ते दुपारी या वेळेत सुटणाऱ्या अप लोकल रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील ल सेवा मात्र रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number