शिवसेना जिल्हा प्रमुखांची वर्षा निवास्थानी बैठक

मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विषयांवर भाष्य केले तर विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या या सभेनंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली असून शिवसेना पक्षाच्या पुढच्या रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच उद्धव ठाकरे यानी […]

शिवसेना जिल्हा प्रमुखांची वर्षा निवास्थानी बैठक

मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विषयांवर भाष्य केले तर विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या या सभेनंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली असून शिवसेना पक्षाच्या पुढच्या रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच उद्धव ठाकरे यानी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले.

काल पार पडलेल्या सभेत उपस्थित असलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना आज बैठकीसाठी थांबण्यास सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. दुपारच्या सुमारास ही बैठक पार पडली असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी गावागावांत शिवसेना कशी बांधता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पुढील २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असं काम करण्याचे आदेशही सर्व जिल्हाप्रमुखांना दिले.

गाव तिथे शिवसेना शाखा स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. राज्यात आपली सत्ता आहे. जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे जनतेशी संवाद साधा. त्यांच्या मागण्या पूर्ण करा. तसेच मविआ सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक बरसत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास तयारी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number