पुणे: सारथी संस्थेच्या विकासासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक , सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांची नवीन सर्किट हाऊस येथे बैठक सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मूक आंदोलनातील एक मागणी म्हणजे सारथी संस्थेचा विकास ही आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी ही बैठक सुरू आहे. यात काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, सारथी बैठकीच्या आधीच पोलीसांनी कारवाई केली होती. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांना पोलीसांनी काहीकाळ ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना घरात स्थानबद्ध करण्यात आले. त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी पाळत ठेवल्याची तक्रार आबासाहेब पाटील यांनी केली आहे.