खेडमध्ये मुखमंत्री शिंदेंची जाहीर सभा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रत्नागिरीमधील खेडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता ही सुरू होणार असून माजी मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांची सभा झालेल्या गोळीबार मैदानावरून मुख्यमंत्री शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली होती. या […]

खेडमध्ये मुखमंत्री शिंदेंची जाहीर सभा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रत्नागिरीमधील खेडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता ही सुरू होणार असून माजी मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांची सभा झालेल्या गोळीबार मैदानावरून मुख्यमंत्री शिंदे यांची तोफ धडाडणार आहे.

खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली होती. या सभेत, ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

खेडमध्ये उद्धव ठाकरेंनी काय टीका केली?

ज्यांना जे शक्य होतं ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना  हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number