जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारतीय बनावटीच्या पाणबुडी व युद्धनौका तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माझगाव गोदीतील 27 कामगारांना निलंबित करण्यात आल्याने सुमारे पाच हजार कामगारांनी बुधवारपासून धर्मराज्य कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केलंय.
कायमस्वरूपी नोकरी व पगारवाढीच्या समितीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी या कामगारांनी उपोषण पुकारलंय. या गोदीत बांधलेल्या आयएनएस कलवरी या पाणबुडीचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होतंय. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला महत्त्व आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.