Pune Road Accident : भीषण अपघात! चाकणजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा वडिलांसह ट्रकखाली चिरडून मृत्यू; आई गंभीर जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील भोर कुटुंबावर रक्षाबंधनाच्या दिवशीच दुःखाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्यासाठी जात असलेल्या 14 वर्षीय मयुरी भोर आणि तिचे वडील राजेंद्र भोर (47) यांचा चाकणजवळ अवजड वाहनाखाली मोटरसायकल आल्याने भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत मयुरीची आई गंभीर जखमी असून चाकण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर […]

Pune Road Accident : भीषण अपघात! चाकणजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा वडिलांसह ट्रकखाली चिरडून मृत्यू; आई गंभीर जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील भोर कुटुंबावर रक्षाबंधनाच्या दिवशीच दुःखाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्यासाठी जात असलेल्या 14 वर्षीय मयुरी भोर आणि तिचे वडील राजेंद्र भोर (47) यांचा चाकणजवळ अवजड वाहनाखाली मोटरसायकल आल्याने भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत मयुरीची आई गंभीर जखमी असून चाकण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चाकण परिसरातील वाढत्या अपघातांवर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : Pune Crime : प्रियकरासोबत मौजमजा! नवऱ्याने बायकोला रंगेहाथ पकडलं, पण पतीलाच बेदम मारहाण, 18 हजारही लांबवले

मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी येथील रहिवासी असलेले भोर कुटुंब वासुलीच्या दिशेने जात असताना पुणे-नाशिक महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकांखाली ही दुचाकी आल्याने राजेंद्र आणि मयुरी यांना जीवघेण्या दुखापती झाल्या. धडक अत्यंत भीषण होती आणि यात पिता-पुत्रीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे दृश्य घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यातून तपास अधिकाऱ्यांना घटनेचे फुटेज उपलब्ध झाले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास केला आणि पुढील कार्यवाही सुरू केली. जखमी महिलेला तातडीने चाकण येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टर तिच्या गंभीर दुखापतींवर उपचार करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number