इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचे सामूहिक दशक्रिया विधी

इरशाळवाडी येथील दुर्घटनेस आज १० दिवस पूर्ण झाले, या दुर्घटनेत अनेकांचे सौंसार उध्वस्त झालेत तर अनेकांनी आपल्या कुटुंबातील कर्त्याला गमावलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या दुर्घटनेचे पडसाद उमटताना दिसले, सर्वच स्थरावरून शोक व्यक्त करण्यात आला. राजकीय क्षेत्रातही याचे पडसाद उमटले राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी दुर्घटना घडल्या मुळे आपले वाढदिवसही साजरे […]

इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचे सामूहिक दशक्रिया विधी

इरशाळवाडी येथील दुर्घटनेस आज १० दिवस पूर्ण झाले, या दुर्घटनेत अनेकांचे सौंसार उध्वस्त झालेत तर अनेकांनी आपल्या कुटुंबातील कर्त्याला गमावलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या दुर्घटनेचे पडसाद उमटताना दिसले, सर्वच स्थरावरून शोक व्यक्त करण्यात आला. राजकीय क्षेत्रातही याचे पडसाद उमटले राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी दुर्घटना घडल्या मुळे आपले वाढदिवसही साजरे केले नाहीत.

या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला तर ५७ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतील मृतांचे सामूहिक दशक्रिया विधी करण्यात आले. दशक्रिया विधीसाठी मृतांचे नातेवाईक मोर्बे धरणालगत जमा झाले होते. सगळ्या २७ मृतदेहांनवर सोबत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पिंडदान करून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मृतांच्या नातेवाईकांकडून यावेळी मोठा आक्रोश आणि शोक व्यक्त करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number