जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
चालत्या ट्रेन मध्ये चढु नये अशा घोषणा सततच रेल्वे स्थानकांत केल्या जात असतात. मात्र बरेचसे प्रवासी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता कुर्ला रेल्वे स्थानकात असाच प्रकार घडला आणि आणि प्लॅटफॉर्मवर उपस्थीत लोकांना ही थरारक दृष्ये पहायला मिळाली.
संध्याकाळी 5 वाजुन 8 मिनीटांच्या कल्याणला जाणाऱ्या चालत्या लोकलमध्ये एका माणसाने चढण्याच्या प्रयत्न केला. पण त्याचा तोल जाउन तो प्लॅटफॉर्म वरुन चालु लोकल मधुन फरपटत पुढे गेला.
चालकाने प्रसंगावधान राखुन लोकल थांबवली. व सुदैवाने त्याचा जीव वाचला. दरम्यान, स्थानकातील थरारक दृष्ये सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.