राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. अशातच अटकेनंतर आता नवाब मलिक यांना कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. तसेच यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती करणार आहोत की त्यांनी मलिकांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मलिकांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा नवाब मलिक यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच आता कशाची वाट पाहताय? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अटकेनंतर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली की, ‘लढेंगे और जितेंगे’. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्याप्रकारे नवाब मलिक म्हणाले आहेत, याला आमच्याकडे ग्रामीणभाषेत कोडगेपणा म्हणतात.