Tukaram Mundhe FDA Action: डॉमिनोजनंतर KFC, मॅकडी, सबवे, बर्गर किंगसारख्या 104 प्रमुख आस्थापनांची FDAकडून झडती; 95 जणांना नोटिसा तर 2 व्यवसाय बंद, 5 परवाने निलंबित

एफडीएकडून या मोहिमेदरम्यान डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंग, स्टारबक्स आणि माँजिनिज यांसारख्या ब्रँड्सच्या एकूण 104 प्रमुख साखळी आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली.

Tukaram Mundhe FDA Action: डॉमिनोजनंतर KFC, मॅकडी, सबवे, बर्गर किंगसारख्या 104 प्रमुख आस्थापनांची FDAकडून झडती; 95 जणांना नोटिसा तर 2 व्यवसाय बंद, 5 परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपहारगृहांवर कारवाई केली जात आहे. अशातच तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने 'जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड'द्वारे चालवल्या जाणाऱ्या मुंबईतील तीन 'डोमिनोज पिझ्झा' आउटलेट्सचे अन्न-व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाने डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

यावेळी परवाने निलंबित करण्यात आलेली आउटलेट्स विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथे आहेत. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एफडीएने केलेल्या या कारवाईमुळे कराडमधील एका 'डोमिनोज' आउटलेटचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे. ही नियामक कारवाई 'अन्नसुरक्षा आणि मानके (अन्न-व्यवसाय परवाना आणि नोंदणी) नियम, 2011' चे थेट उल्लंघन केल्यामुळे करण्यात आली. विशेषतः 'अनुसूची 4' मध्ये नमूद केलेल्या अनिवार्य स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन न केल्यामुळे ही पावले उचलण्यात आली. 

हेही वाचा- Tukaram Mundhe Tweet: 'पदं बदलतात, पण…', राज्यात अनेक धडक कारवाया, अशातच तुकाराम मुंढेंचं तीन ओळींचं ट्वीट; नेमकं काय लिहिलं?

तर दुसरीकडे राज्यभर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने राबवलेल्या मोहिमेचा भाग म्हणून 11 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आल्या होत्या. एफडीएकडून या मोहिमेदरम्यान डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंग, स्टारबक्स आणि माँजिनिज यांसारख्या ब्रँड्सच्या एकूण 104 प्रमुख साखळी आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये 2 व्यावसाय तात्काळ बंद करण्यात आले. तर 5 परवाने निलंबित तर 95 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तर पाच अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. 

तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमध्ये अपुरी स्वच्छता व निर्जंतुकीकरण, कीटक नियंत्रणातील समस्या, अन्नाची अयोग्य साठवणूक व तापमानावर देखरेखीचा अभाव, कच्चा माल आणि खाण्यास तयार अन्न यांच्यात विलगीकरणाचा अभाव, तसेच अन्नसुरक्षेविषयक अपूर्ण नोंदी यांचा समावेश होता. ही कारवाई 'अन्नसुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाने आणि नोंदणी) नियमन, 2011' (अंतर्गत करण्यात आली आहे, असं एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले. 

सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे  यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम  राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number