Sindhudurg Tourist Drowning Case : सिंधुदुर्गात शिरोडा-वेळागर समुद्रात पर्यटक बुडाले; 4 जणांचा मृतदेह सापडला, एक गंभीर, तर उर्वरीत 3 जणांचा शोध सुरू

बेपत्ता असलेल्या चार पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक, पोलीस आणि महसूल विभागाकडून वेळागर समुद्रात सुरू आहे.
Sindhudurg Tourist Drowning Case : सिंधुदुर्गात शिरोडा-वेळागर समुद्रात पर्यटक बुडाले; 4 जणांचा मृतदेह सापडला, एक गंभीर, तर उर्वरीत 3 जणांचा शोध सुरू

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – वेळागर येथील समुद्रात सायंकाळी घडलेल्या एका मोठ्या दुर्घटनेत एकूण 8 पर्यटक बुडाले. काही जण येथे नऊ पर्यटक असल्याचे सांगत आहेत. या आठ पर्यटकांपैकी 5 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे. दुर्दैवाने, बाहेर काढलेल्या 5 जणांपैकी 4 जण मयत झाले असून, एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. अत्यवस्थ महिलेला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 4 बेपत्ता पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथकाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा – Mumbai Konkan Services : कोकणवासियांसाठी दिलासा! कोकणात 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार रो-रो सेवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मृत आणि वाचलेल्या पर्यटकांची माहिती
या दुर्घटनेत बळी पडलेले आणि वाचलेले पर्यटक लोंढा (बेळगाव) येथील कित्तूर कुटुंबातील आहेत.
वाचलेली (अत्यवस्थ) महिला: इसरा इम्रान कित्तूर, वय 17, रा. लोंढा, बेळगाव.
मयत झालेले पर्यटक (3):
– श्रीमती फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव
– श्री इबाद इरफान कित्तूर, वय 13, रा. लोंढा, बेळगाव
– श्रीमती नमीरा आफताब अख्तर, वय 16, रा. अल्लावर, बेळगाव
– आणखी एका मृत पर्यटकाचे नाव समजलेले नाही.

बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू
सध्या समुद्रात बेपत्ता असलेल्या उर्वरित 4 पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. यात लोंढा (बेळगाव) येथील इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय 36) आणि इक्वान इमरान कित्तूर (वय 15) तसेच कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील फरहान मोहम्मद मणियार (वय 20) आणि जाकीर निसार मणियार (वय 13) यांचा समावेश आहे. वेळागर समुद्राच्या घटनास्थळी पोलीस, महसूल आणि ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, येथील स्थानिक नागरिकांनी माहिती दिली की, सध्या समुद्राला भरती असल्यामुळे आणि वाराही वेगवान असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही समुद्रात जात नाही. या पर्यटकांनाही येथील स्थानिक नागरिकांनी याची माहिती देत समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या पर्यटकांनी तो मानला नाही, असे समोर आले आहे. यानंतरच ही दुर्घटना घडली.

हेही वाचा – Guldar Boat Sindhudurg : ‘गुलदार’ च्या रूपात कोकणातील पर्यटनाला नवी ओळख; निवृत्त युद्धनौकेतून जलपर्यटन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version