Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मिक कराडसह आरोपींचा खटला लांबणीवर टाकण्याचा डाव अ‍ॅड. निकमांनी उधळला

बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने आज आरोपींना थेट दणका दिला असून, अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.<br/>
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मिक कराडसह आरोपींचा खटला लांबणीवर टाकण्याचा डाव अ‍ॅड. निकमांनी उधळला

Santosh Deshmukh Case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि राजकारणाच्या पटलावर वादळ निर्माण करणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली. बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने आज आरोपींना थेट दणका दिला असून, अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?  

बीडच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद सुरू करताच सर्वांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. न्यायालयाने आज आरोपींवरील आरोपांचा मसुदा (Draft Charges) वाचून दाखवला. 'आरोप मान्य आहेत का?' या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी 'आरोप मान्य नाहीत' असे सांगून बचावाचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने आज अखेर 'आरोप निश्चित' (Charge Frame) करून आरोपींच्या अडचणी वाढवल्या आहेत.

हेही वाचा – Mumbai Local Train: भयंकर! रेल्वेत महिलांच्याच डब्यातून नराधमाचा प्रवास, उतरण्यास सांगितल्यानं त्यानं तरुणीलाचं धावत्या लोकलमधून फेकले खाली

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने सत्ताधारी गटात मोठी खळबळ उडाली होती. आरोपांची धार इतकी तीव्र होती की, तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेनंतर राज्यभर जनआक्रोश मोर्चे निघाले आणि परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती.

ॲड. उज्ज्वल निकम यांचा प्रहार 

सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, आरोपींच्या वकिलांनी हा खटला रेंगाळण्यासाठी (Delay) आणि विचलित (Derail) करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने अखेर आज आरोप निश्चित केले आहेत. केवळ खंडणी मिळवण्यात अडथळा येत होता, म्हणूनच संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं, असं निकम यांनी नमूद केलं.   

हेही वाचा – Assam Violence : आसाममध्ये हिंसाचार! भाजप नेत्याचे घर पेटवले; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर, नेमकं काय घडलं?

दरम्यान, न्यायालयाने आता प्रत्यक्ष पुराव्यांचे काम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. या तारखेला न्यायालयात कोणते नवीन पुरावे समोर येतात आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण हे स्पष्ट होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version