Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! फेब्रुवारीचा हप्ता लवकरच होणार जमा; पण 31 मार्चपूर्वी…

अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक चुका केल्याचे समोर आले होते. अशा महिलांना आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने दिलेली मुदतवाढ संपत आली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! फेब्रुवारीचा हप्ता लवकरच होणार जमा; पण 31 मार्चपूर्वी…

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. या योजनेचा फेब्रुवारी 2026 चा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 277 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित झाल्यानंतर आता फेब्रुवारीच्या 1,500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारी हप्त्यासाठी 277 कोटींचा निधी मंजूर
राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेली ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सरकारने प्रशासकीय हालचाली वेगवान केल्या आहेत. बजेटमधील तरतुदीनुसार 277 कोटी रुपयांचा निधी वर्ग झाल्यामुळे येत्या काही दिवसांतच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांना हा लाभ विनाअडथळा मिळणार आहे.

हेही वाचा – Rohit Pawar: 'प्रफुल पटेल, तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घ्यायचा होता…'; रोहित पवारांचा गंभीर आरोप

ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31मार्चपर्यंतची शेवटची संधी
या योजनेचा लाभ कायमचा मिळवण्यासाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महिलांनी अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक चुका केल्याचे समोर आले होते. अशा महिलांना आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता या मुदतीला फक्त 6 दिवस शिल्लक राहिले आहेत. जर या कालावधीत दुरुस्ती पूर्ण झाली नाही, तर एप्रिल महिन्यापासूनचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लाभार्थींच्या संख्येत घट आणि खबरदारी
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच पात्र महिलांनी तातडीने आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रावरून दुरुस्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी अपडेट नसल्यास केवळ फेब्रुवारीचाच नाही, तर पुढील सर्व हप्ते रखडू शकतात. त्यामुळे 31 मार्चची वाट न पाहता महिलांनी तातडीने आपले स्टेटस तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – What is Zero FIR : निर्भया प्रकरणानंतर 'हा' कायदा आला अस्तित्वात, अजित पवार अपघात प्रकरणाने पुन्हा आला प्रकाशझोतात; काय आहे 'झिरो FIR'? जाणून घ्या सविस्तार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version