छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांच्यावर नेटकऱ्यांनी आरोप केले आहे. यावर माहीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांवर दुर्लक्ष केल्याच्या आरोप हा नेटकऱ्यांनी माही आणि जयवर केला आहे. माही विज आणि जय भानुशाली. यांना तीन मुले आहेत. खुशी, राजवीर आणि तारा. तारा ही त्यांची स्वत: ची मुलगी आहे. तर खुशी आणि राजवीर हे दत्तक घेतलेली मुले आहेत. ताराच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अनेकदा त्यांना ट्रोल केल्या जात आहे.
आता माहीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माहीने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने दत्तक मुलांनावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. “आम्ही राजवीर आणि खुशीला दत्तक घेतलेले नाही. त्यांचे आई-वडील आहेत. त्यांचे वडील अजूनही आमच्यासोबत काम करतात. त्यांना एक आई आहे. फक्त एवढंच आहे की जन्म झाल्यापासून ते आमच्यासोबत राहिले आहेत. ते मला मम्मा आणि जयला डॅडा बोलतात. माझ्या मुलांच आणि माझं नातं हे वेगळं आहे. आम्ही सगळे एकत्र होतो. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. कायदेशीरपणे आम्ही त्यांना दत्तक घेतलेले नाही. हे सगळं कुठून आलं हे मला माहित नाही. मला कोणाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याची गरज वाटतं नाही.” असं माहीने म्हटलं. ती पुढे म्हणाली, “राजवीर आणि खुशी त्यांच्या गावी परत गेले आहेत कारण त्यांच्या आजोबांना वाटते की ते गावी राहिले तर अधिक सुरक्षित राहतील. जय आणि माही यांनी त्यांच्या घरी काम करण्याऱ्या महिलेच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलतं आहे. तर २०१९ मध्ये माहीने ताराला जन्म दिला. ताराच्या जन्मापूर्वी जय आणि माही हे त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या मुलांचा खर्च हे उचलत होते.