Maharashtra Weather: उष्णतेनंतर आता पावसाचा तडाखा; 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट, मुंबईत ‘या’ तारखेला पावसाची दमदार एन्ट्री

महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात मान्सून दाखल झाला असून मुंबईत 10 जूनच्या आसपास पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Weather: उष्णतेनंतर आता पावसाचा तडाखा; 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट, मुंबईत ‘या’ तारखेला पावसाची दमदार एन्ट्री

राज्यात मान्सूनची चाहूल लागली असतानाच हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्थांकडून महत्त्वाचे अंदाज समोर आले आहेत. कोकणात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यावर सध्या विविध हवामान प्रणालींचा प्रभाव दिसून येत आहे. बिहार परिसरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीचा परिणाम मध्य भारतावर होत असून त्याचबरोबर अरबी समुद्रातही कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : राज्यसभेची उमेदवारी न मिळल्याने छगन भुजबळ यांची खदखद, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

मान्सूनने कोकण किनारपट्टीत प्रवेश केला असून त्याचा पुढील प्रवास हळूहळू सुरू आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये १० जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा विस्तार होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. साधारणपणे जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यभर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत जोरदार पावसाची नोंद झाली असून त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गालाही दिलासा मिळत आहे.

मात्र दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती वेगळी आहे. अनेक भागांमध्ये अद्यापही उष्णतेची लाट कायम असून काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या भागात पावसाची प्रतीक्षा कायम असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: Bhide Bridge Closed: पुणेकरांनो तयारीत रहा; 9 जूनपासून भिडे पूल बंद, तब्बल 3 महिने प्रवासाचे गणित बदलणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 आणि 10 जूनदरम्यान राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशाच्या इतर भागांमध्येही पावसाची स्थिती सक्रिय होताना दिसत आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू तसेच ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्येही पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचा वेग वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले असून येत्या काही दिवसांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number