Maharashtra Weather Updates : पुढील काही तास जोखमीचे! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Updates : पुढील काही तास जोखमीचे! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच, हवामान खात्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासह, 27 सप्टेंबर रोजी मुंबई, रायगड, ठाणे, इतर जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, 28 सप्टेंबर रोजी रायगड आणि पुण्याच्या घाटांवर मुसळधार पाऊस पडणार असल्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. यासह, प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

रत्नगिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस होत असून नवरात्रौत्सवाच्या काळात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, रात्रीच्या सुमारास रत्नगिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई वेधशाळेने, पुढील चार दिवसांत म्हणजे, 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान रत्नगिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यामुळे, शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडले आहे. 

इलापूर धरणाच्या 11 दरवाज्यांमधून 18 हजार 668 क्युसेक विसर्ग पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने मराठवाड्याहून विदर्भाकडे जाणारा पुसद-शेंबाळपिंपरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसामुळे नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. वसमत तालुक्यातील पांघरा शिंदे, दांडेगाव दांडेगावकडे जाणारे मार्ग ओढ्याला पाणी आल्याने बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

'या' जिल्ह्यात हवामान खात्याने जारी केला ऑरेंज आणि येलो अलर्ट:

ऑरेंज अलर्ट: मुंबई, रायगड, ठाणे, पुण्यातील घाट, साताऱ्यातील घाट, रत्नगिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापुरातील घाट, धाराशिव, लातूर आणि नांदेड. 

येलो अलर्ट: पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि इतर जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number