TET Exam 2026 In Maharashtra : NEET-UG परीक्षेमुळे TET च्या परीक्षा वेळापत्रकात बदल; आता 21 जूनऐवजी या तारखेला होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

TET Exam 2026 In Maharashtra : NEET-UG परीक्षेमुळे TET च्या परीक्षा वेळापत्रकात बदल; आता 21 जूनऐवजी या तारखेला होणार परीक्षा

पुणे : नीट-यूजी परीक्षा 21 जून रोजी होणार असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता टीईटी परीक्षा 28 जून रोजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नव्या वेळापत्रकानुसार पेपर क्रमांक एक सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत, तर पेपर क्रमांक दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे. पात्र उमेदवारांना 16 जून ते 28 जूनदरम्यान प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार असून अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा : NEET UG 2026 : NEET परीक्षेचा पॅटर्न बदलणार! पुढील परीक्षा OMR शीटऐवजी आता…

दरम्यान, पेपरफुटीच्या प्रकारानंतर काल, शुक्रवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नीटचा पेपर देण्यासाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) च्या मते, भारत सरकारच्या मान्यतेने रविवार, 21 जून रोजी नीट-यूजी 2026 फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) शुक्रवारी जाहीर केले की, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा पदवी (NEET-UG) 2026 ची फेरपरीक्षा 21 जून रोजी घेतली जाईल. 3 मे रोजीची परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द झाल्यानंतर 22 लाखांहून अधिक वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक दिवसांच्या अनिश्चिततेला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number