Maharashtra Rain: राज्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून 17 ऑगस्टपर्यंत अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून पुणे घाटासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

महाराष्ट्र: महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी सुरू असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीजवळ सक्रिय असलेल्या मान्सून ट्रफमुळे महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक भागांत पाऊस राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो. घाटमाथ्यावर मुसळधार ते काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्येही पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातही सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा: Missile Attack On Vela Nova : ओमानच्या आखातात 'वेला नोव्हा' जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; किनारपट्टीजवळ सुरक्षा यंत्रणा सतर्क

पावसामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा वेग काही ठिकाणी मंदावला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही पाणी साचल्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून येत आहे. सायन-बेलापूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. भांडूप ते विक्रोळी दरम्यान एलबीएस मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

दरम्यान, पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढू शकतो. 17 ऑगस्टच्या आसपास विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुलनेने हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: Columbia Earthquake : कोलंबियामध्ये विनाशकारी भूकंप; 20 हून अधिक इमारती कोसळल्या, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number