Naxal Surrender: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या विरोधातील लढाईला आज मोठे यश मिळाले आहे. खैरागड जिल्ह्यातील बकरकट्टा परिसरात कुख्यात माओवादी कमांडर रामधेर मज्जी याने 11 सहकाऱ्यांसह आज सकाळी आत्मसमर्पण केले. या मोठ्या घडामोडीनंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड झोन अधिकृतपणे माओवादीमुक्त घोषित करण्यात आला आहे.
1 कोटींचा बक्षीस घोषित असलेला रामधेर मज्जी शरण
हिदमाच्या बरोबरीचा मानला जाणारा केंद्रीय समिती सदस्य (CCM) रामधेर मज्जी हा सुरक्षा यंत्रणांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत होता. त्याच्यावर तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. हिदमानंतर छत्तीसगडमधील तो सर्वात प्रभावी आणि दुसऱ्या क्रमांकाचा माओवादी नेता मानला जात होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – Kanpur Crime News: कानपूर हदरले! 20 लाखांच्या लालसेने घेतला मैत्रीचा जीव
12 माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण
बकरकट्टा पोलीस ठाण्यात आज सकाळी सर्व 12 माओवाद्यांनी शस्त्रे ठेवून आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 6 महिला माओवादी देखील आहेत. या गटामध्ये CCM, DVCM, ACM आणि PM पदांवर कार्यरत असलेले महत्त्वाचे सदस्य सामील आहेत.
माओवादी हिंसाचारातून मुख्य प्रवाहात पुनरागमन
कुम्ही गावात घडलेल्या या सामूहिक आत्मसमर्पणानंतर सर्व माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याची घोषणा केली. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश झोनमध्ये अनेक गंभीर माओवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या या सदस्यांवर एमएमसी झोनमधील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हेही नोंद आहेत.
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी
दीर्घकाळ माओवाद्याच्या विळख्यात असलेल्या एमएमसी (महाराष्ट्र–मध्य प्रदेश–छत्तीसगड) झोनला आज अखेर माओवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला. सुरक्षा यंत्रणांच्या दीर्घकालीन मोहिमा, सातत्यपूर्ण दबाव, विकासकामांवर भर आणि जनसहभागामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला मोठा तडा गेला असून परिसरात शांतता आणि स्थैर्याचा मार्ग मोकळा होत असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.