Maharashtra Local Body Election Results 2025 : मतमोजणीला सुरूवात! विजयी नगराध्यक्षांची यादी; वाचा सविस्तर

राज्यातील 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली आहे.

Maharashtra Local Body Election Results 2025 : मतमोजणीला सुरूवात! विजयी नगराध्यक्षांची यादी; वाचा सविस्तर

राज्यातील 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली आहे. दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला जाईल. पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला झालेली निवडणूक आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व 143 सदस्यपदांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात कोणाला कौल मिळाला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. काही जागांचे कल येण्यास सुरूवाती झाली असून काही ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

आतापर्यंतचे विजयी नगराध्यक्ष – 

चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
मालवण नगरपरिषद – ममता वराडकर (शिंदे गट)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)

हेही वाचा : Maharashtra Nagar Parishad Result 2025: दोन घराण्यांची लढाई आणि निकालापूर्वीच ‘विजयोत्सवाची’ तयारी; चाळीसगावमध्ये राजकीय धुराळा

वेंगुर्ले
 

विजयी नगरसेवक

लीना म्हापणकर, शिंदे सेना
रवींद्र शिरसाट, भाजप
गौरी माईनकर, भाजप
प्रीतम सावंत, भाजप

अहिल्यानगर / पाथर्डी 

पाथर्डीत भाजपने विजयाच खाते उघडलं. पाथर्डी नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे नगरसेवक पदाचे दोनही उमेदवार विजयी. बजरंग घोडके व मंगल कोकाटे हे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यात नगरसेवक काँग्रेसने खाता उघडलं गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी.

सासवड नगरपरिषद निवडणूक – प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी

अकोला

अकोट नगरपालिकेत एमआयएमने पहिल्या 4 जागा जिंकल्यात. पहिले चार निकाल एमआयएमच्या बाजूने. प्रभाग एकमधून रेश्मा परवीन अजीम इनामदार आणि डॉ. युसुफ खान नगरसेवक पदावर विजयी. तर प्रभाग दोनमधून दोनमधून दिलशाबी रज्जाक खान आणि  हन्नान शहा विजयी. अकोटमध्ये एमआयअमची मुसंडी.

बाळापुरमधून मशाल या चिन्हावरचे उमेदवार बलबीर सिंग करण सिंग कोरिया यांचा विजय झाला आहे.

रत्नागिरी

राजापूर नगर परिषद काँग्रेसच्या हुस्नबानो खलिपे आघाडीवर. रत्नागिरी नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे ३ हजार मतांनी आघाडीवर

पालघर 

वाडा नगरपंचायत मतमोजणी. वाडा नगरपंचायतवर भाजप आघाडीवर. भाजपचे 17 पैकी सहा नगरसेवक विजयी.

अमरावती 

अमरावती जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतची मतमोजणी सुरू. नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेले धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे सहा उमेदवार विजयी. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये धामणगाव रेल्वेमधून भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड 181 मतांनी आघाडीवर.

रत्नागिरी

चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम आघाडीवर. राष्ट्रवादी (शरद पवार गट)

वाशिम 

मंगरूळपिर नगर परिषद – अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे अशोक परलीकर आघाडीवर

अमरावती

धामणगाव रेल्वे नगर परिषदेत आता भाजपच्या डॉ अर्चना रोठे आघाडीवर. धामणगाव रेल्वेमध्ये 6 नगरसेवकपदी भाजपचे उमेदवार विजयी

वडगाव

वडगाव मावळ नगरपंचायत पहिला निकाल हाती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल ढोरे एक मताने निवडून आले.

पालघर

पालघर नगरपरिषद निवडणूकित शिंदे शिवसेनेचे उत्तम घरत आघाडीवर तर भाजपचे कैलास म्हात्रे पिछाडीवर

वर्धा 

वर्ध्यात काँग्रेसचे सुधीर पांगुळ पोस्टल  मतमोजणीत आघाडीवर

अमरावती 

अमरावती जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतची मतमोजणी सुरू. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणीला सुरुवात. पहिल्या फेरीमध्ये धामणगाव रेल्वे मधून भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड 50 मतांनी पिछाडीवर.

परतवाड्याच्या प्रभाग क्रमांक १ येथून काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी

मात्र पहिल्या फेरीमध्ये  धामणगाव रेल्वे मधून भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड 50 मतांनी पिछाडीवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number