लागल्यानंतर आता निकालाच्या तारखेबाबत नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र काही नगरपरिषदांमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्यानंतर या भागांसाठी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचा सुधारित आदेश 29 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. या बदललेल्या कार्यक्रमाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
अशातच आता याबद्दलची नवीन अपडेट समोर आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.