अनिल देशमुख यांचे दोन निकटवर्तीय ईडीकडून अटकेत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचलनालयाकडून त्यांच्या नागपूर आणि मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, शनिवारी अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या संबंधित […]

अनिल देशमुख यांचे दोन निकटवर्तीय ईडीकडून अटकेत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचलनालयाकडून त्यांच्या नागपूर आणि मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, शनिवारी अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने झाडाझडती घेतली. १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने शुक्रवारी सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल ८ ते ९ तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number