BBA BCA BMS CET Result 2026 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) अखेर बहुप्रतिक्षित बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीएचएमसीटी (BBA, BCA, BMS, BHMCT) या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या अटीतटीच्या परीक्षेत राज्यातील 5 विद्यार्थ्यांनी परिपूर्ण 100 पर्सेन्टाईल (Percentile) मिळवून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी वापरून आपली गुणपत्रिका डाउनलोड करता येईल. या निकालासोबतच सीईटी सेलने प्रवर्गनिहाय (Category-wise) टॉपर विद्यार्थ्यांची अधिकृत यादी देखील जाहीर केली आहे.
62,300 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा; 87.66 टक्के राहिली उपस्थिती
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रवेश परीक्षा 28 आणि 29 एप्रिल 2026 रोजी एकूण 4 सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने (CBT) घेण्यात आली होती. या व्यावसायिक कोर्सेससाठी संपूर्ण राज्यातून एकूण 71,067 उमेदवारांनी आपली नोंदणी केली होती. त्यापैकी 62,300 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते, म्हणजेच परीक्षेची एकूण उपस्थिती 87.66 टक्के नोंदवली गेली. या परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:
100 पर्सेन्टाईलचे मानकरी (टॉपर): अर्जुन ब्रीद (ठाणे), खिल्ती हेमल शाह (सोलापूर), ओजस उदय पोवार (रायगड), इभाड वेदांत राजेश (पुणे) आणि निकेत खत्री (जयपूर) या 5 जणांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले.
– खुला प्रवर्ग (Open): अर्जुन ब्रीद (ठाणे), खिल्ती हेमल शाह (सोलापूर), ओजस उदय पोवार (रायगड) – प्रत्येकी 100 पर्सेन्टाईल.
– ओबीसी (OBC): इभाड वेदांत राजेश (पुणे) – 100 पर्सेन्टाईल.
– एससी (SC): मुद्रा विजय वाघमारे (मुंबई उपनगर) – 99.88 पर्सेन्टाईल.
– एसटी (ST): सुश्रुत जयंत फुलकर (नाशिक) – 99.97 पर्सेन्टाईल.
– एसईबीसी (SEBC): पवार ज्ञानराज दिलीप (नांदेड) – 99.08 पर्सेन्टाईल.
– डीटी/व्हीजे (DT/VJ): ओम प्रवीण पाटील (जळगाव) – 99.48 पर्सेन्टाईल.
– एनटी-बी (NT-B): गिरी राजेश कपिल (पुणे) – 98.49 पर्सेन्टाईल.
– एनटी-सी (NT-C): रश्मिता महेंद्र मडके (ठाणे) – 99.85 पर्सेन्टाईल.
– एनटी-डी (NT-D): प्रथमेश सुदाम दोंड (ठाणे) – 99.88 पर्सेन्टाईल.
– एसबीसी (SBC): अनिका भूषण मुसळे (पुणे) – 99.92 पर्सेन्टाईल.
– महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी (OMS): निकेत खत्री (जयपूर) – 100 पर्सेन्टाईल.
अधिकृत वेबसाईटवर गुणपत्रिका उपलब्ध; कॅप राउंड लवकरच होणार सुरू
परीक्षार्थी उमेदवारांना त्यांचे विषयवार गुण आणि अंतिम गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर आता राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राबवली जाणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच 'कॅप राउंड'चे (CAP Round 2026) सविस्तर वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका लवकरच प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परीक्षा कक्षाने दिली आहे. पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे गुण, प्रवर्ग आरक्षण आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमानुसार (Options form) जागांचे वाटप केले जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.