‘स्पॉन्सरशिपचं राजकारण करणाऱ्यांना करू द्या’ – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जर कोणी कोणाच्या स्पॉन्सरशिपने राजकारण करत असेल तर करू द्या, असा अप्रत्यक्ष टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, अयोध्येत जाण्याचा निर्णय शिवसेनेने केलेला आहे, असा प्रश्न चुकीचा आहे. शिवसेना नेहमची अयोध्येत गेली आहे. आमचे अयोध्येशी नातं आहे. हा […]

‘स्पॉन्सरशिपचं राजकारण करणाऱ्यांना करू द्या’ – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जर कोणी कोणाच्या स्पॉन्सरशिपने राजकारण करत असेल तर करू द्या, असा अप्रत्यक्ष टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, अयोध्येत जाण्याचा निर्णय शिवसेनेने केलेला आहे, असा प्रश्न चुकीचा आहे. शिवसेना नेहमची अयोध्येत गेली आहे. आमचे अयोध्येशी नातं आहे. हा निवडणुकीचा आग नाही आणि राजकीय षडयंत्र नाही. अयोध्या आणि शिवसेनेचे भावनिक नातं आहे. महाराष्ट्रात सरकार झाल्यावर मुख्यमंत्री दोन वेळा अयोध्येत गेले आहेत. आम्ही राजकीय फायद्यासाठी करत नाहीत, आमचं मन साफ आहे. आम्ही श्रद्धेसाठी करतो. त्यामुळे कुणाला जायचं जाऊ द्या, स्वचछ मनाने जावं. राजकीय भावनेने जाण्याऱ्यांना रामलल्ला मदत करत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

तसेच जेम्स लेन पुस्तक प्रकरणी राषट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर संजय राऊत म्हणाले, भाजप पक्ष काहीही म्हणू शकतं. भाजपच्या म्हणण्यावर महाराष्ट्र चाललेला नाही. कायद्याचं राज्य आहे आणि ते कायद्यानुसार चालेल, असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number