जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. वाडेकरांवर मुंबईत उद्या दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
वाडेकरांचाी दोन्ही मुलं परदेशात असल्याने त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित वाडेकर आजारी होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1971 साली इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांवर मात कूरून भारताल परदेशातील कसोटी मालिका जिंकून देणारे ते पहिले कर्णधार होते.
अजित वाडेकरांचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने 1967 साली अर्जून पुरस्काराने आणि 1972 साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.