Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीचा आनंदमय सोहळा; जाणून घ्या मूर्ती स्थापनेची योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी…आज, सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभरातील भाविक आपल्या घरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये भगवान गणेशाचे स्वागत करत आहेत. हा उत्सव भगवान गणेशाच्या पारंपरिक जन्माचे प्रतीक असून, यादरम्यान प्रार्थना, मूर्तीची प्रतिष्ठापना, नैवेद्य अर्पण आणि आरती यांसारखे विधी केले जातात. यातील सर्वात महत्त्वाच्या विधींपैकी एक म्हणजे 'गणपती स्थापना'. यादरम्यान भाविक पूजेसाठी तयार […]

Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीचा आनंदमय सोहळा; जाणून घ्या मूर्ती स्थापनेची योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी…आज, सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभरातील भाविक आपल्या घरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये भगवान गणेशाचे स्वागत करत आहेत. हा उत्सव भगवान गणेशाच्या पारंपरिक जन्माचे प्रतीक असून, यादरम्यान प्रार्थना, मूर्तीची प्रतिष्ठापना, नैवेद्य अर्पण आणि आरती यांसारखे विधी केले जातात. यातील सर्वात महत्त्वाच्या विधींपैकी एक म्हणजे 'गणपती स्थापना'. यादरम्यान भाविक पूजेसाठी तयार केलेल्या पवित्र स्थानी गणेशाच्या मूर्तीची आदरपूर्वक प्रतिष्ठापना करतात. कुटुंबे आपली घरे स्वच्छ व सुशोभित करतात. पूजेचे आवश्यक साहित्य आणून आपापल्या प्रथेनुसार मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 1.40 वाजेपर्यंत म्हणजेच मध्यान्ह काळात सकाळी 11.02 ते दुपारी 1.31 पर्यंत करणे अत्यंत शुभ मानले जाते. 

हेही वाचा : Ganeshotsav 2026 : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात कोकणात बाप्पाचे आगमन!; ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात घरोघरी गणरायाचे स्वागत

मूर्ती स्थापना व पूजेची योग्य पद्धत –

तयारी व स्वच्छता : देवघर आणि मखर स्वच्छ करून पाटावर (चौरंगावर) लाल किंवा पांढरा शुभ्र वस्त्र अंथरावा. त्यावर अक्षता किंवा तांदूळ ठेवावेत.

मूर्तीचे आगमन : गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना तिचा चेहरा कापडाने झाकलेला असावा. मूर्ती पाटावर स्थापन करताना बाप्पाचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. 

कलश स्थापना : पाटाजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात आंब्याची पाने, सुपारी, नाणे आणि दूर्वा टाकाव्यात व त्यावर नारळ ठेवावा. 

संकल्प : उजव्या हातात अक्षता, पाणी आणि सुपारी घेऊन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी पूजेचा संकल्प करावा आणि पाणी ताम्हणात सोडावे.

प्राणप्रतिष्ठा व पूजन : दोन दुर्वांकुरांनी गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी. बाप्पाला अष्टगंध, हळद-कुंकू, अक्षता, जानवे आणि वस्त्र अर्पण करावे.

नैवेद्य व आरती : बाप्पाला मोदक आणि दूर्वा अतिशय प्रिय असल्याने त्यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर मनोभावे आरती करावी. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number