यंदाच्या वर्षीही लालबागच्या राजाच्या दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली. दिवसेंदिवस बाप्पाच्या दर्शनाची रांग वाढतच आहे. सामान्यांपासून ते मोठं मोठे सेलिब्रेटीस, खेळाडू आणि व्यापारी या दर्शनासाठी न विसरता हजेरी लावतात. त्यामुळे पहिल्या 3 दिवसांत मंडळाला 1.9 कोटी रुपये रोख + 647.47 ग्रॅम सोनं (किंमत 98.9 लाख रुपये) + 12,389 ग्रॅम चांदी देणगी म्हणून मिळाली आहे. पहिल्या 2 दिवसांतच 292.890 ग्रॅम सोनं आणि 8.322 किलो चांदी दानपेटीतून निघाली होती.
याआधीच एका भक्ताने लालबागच्या राजाला डॉलरच्या नोटांचा हार अर्पण करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आणि आता त्यानंतर एका अज्ञात भक्ताने राजासाठी चक्क सोन्याचा हार अर्पण केला आहे. हा हार अर्पण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.सालाबादप्रमाणे यंदाही मंडळाने या अज्ञात भक्ताचं नाव गुप्त ठेवलं आहे, त्यामुळे भक्तांच्या मनात या दानशूर भक्ताबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.