Ladki Bahin Yojana:नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; खात्यात जमा झाले 1500 रुपये

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा एक महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला आहे

Ladki Bahin Yojana:नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; खात्यात जमा झाले 1500 रुपये

Ladki Bahin Yojana: नवं वर्ष सुरू होताच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्यांचे एकत्र पैसे कधी मिळणार, याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता या योजनेबाबत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 31 डिसेंबरपासून एका महिन्याचा हप्ता, म्हणजेच 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यातच हे पैसे जमा होत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यात रक्कम जमा झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून सुमारे 2 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जातात. मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. दरम्यान, तीन महिन्यांचे एकत्र 4500 रुपये मिळणार, अशा चर्चाही सुरू होत्या. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

हेही वाचा: New Year rules 2026: नववर्षापासून मोठे बदल! रेशन कार्ड, पॅन-आधार ते क्रेडिट स्कोअरपर्यंत आजपासून लागू नवे नियम

1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, उर्वरित हप्त्यांबाबत अद्याप स्पष्टता नाही

सध्या केवळ एका महिन्याचा हप्ता जमा होत असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार, याबाबत अद्याप सरकारकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उर्वरित दोन महिन्यांच्या हप्त्याची महिलांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे किंवा बँक खात्याचा बॅलेन्स तपासून पैसे जमा झाले आहेत की नाही, हे सहज पाहू शकतात.

हेही वाचा: Maharashtra Weather: हिवाळ्यात पावसाचा धक्का! नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत मुसळधार सरी

ई-केवायसी केलेल्यांनाच मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने हा निर्णय घेतला होता. सुरुवातीला ई-केवायसीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. मात्र अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने ही मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली.

31 डिसेंबर रोजी अखेर ही मुदत संपली असून, ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number