Ladki Bahin Yojana August Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंर्तगत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतात. परंतु ऑगस्ट महिन्याची रक्कम अजून जमा न झाल्यामुळे येत्या गणेशोत्सवात ऑगस्ट आणि सप्टेंबर चे हफ्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे सणासुदीच्या काळात गृहिणींना दिलासा मिळण्याची संभावना होती. परंतु जुलै महिन्याच्या हफ्त्याचे वितरण अजून सुरू आहे. त्यामुळे सध्या 1 कोटी 64 लाख 82 हजार महिलांच्या खात्यात 2,437 कोटी रुपये DBT च्या माध्यमातून जमा केल्याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सवात ऑगस्टचा हप्ता येणार?
16 सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र ही तारीख अधिकृत नाहीय. राज्य सरकारकडून या दोन हफ्त्याविषयी कोणतीच अपडेट अजून आली नसून ही बाब चर्चेपुरतीच आहे. तसेच लाड्क्या बहिणींनी ही मागणी केली असून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.