Kurla Premnagar Maharaja Ganesh Idol Collapse: मुंबईत अघटित घटना! गणेशमूर्ती आगमनादरम्यान कोसळली; मंडळातील 2 कार्यकर्ते…

मुंबईच्या कुर्ल्यात प्रेमनगरच्या महाराजांची सुमारे 15 फूट उंच गणेशमूर्ती कोसळली. या घटनेत दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

Kurla Premnagar Maharaja Ganesh Idol Collapse: मुंबईत अघटित घटना! गणेशमूर्ती आगमनादरम्यान कोसळली; मंडळातील 2 कार्यकर्ते…

मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणाऱ्या घटनांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कुर्ल्यातही गणेशमूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मूर्ती घेऊन जाणाऱ्या दोन गणेशभक्तांना किरकोळ दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला बैलबाजार येथून धारावीतील ‘प्रेमनगरचा महाराजा’ गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाण्यात येत होती. मूर्ती घेऊन जाणारे वाहन एलबीएस मार्गावरून पुढे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळील गतिरोधकावर हा प्रकार घडला. अचानक झालेल्या धक्क्यामुळे सुमारे १५ फूट उंचीची गणेशमूर्ती कोसळली.

या दुर्घटनेत संतोष जैस्वार आणि रोहित जैस्वार हे दोन गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भुलेश्वरमधील दुर्घटनेनंतर पुन्हा घटना

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्ती आगमनादरम्यान कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. सुमारे २२ फूट उंचीची मूर्ती कोसळल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर गणेशमूर्तींची वाहतूक, उंची, वाहनांची क्षमता आणि मार्गातील अडथळे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, त्या दुर्घटनेचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना गणेशमूर्तींची वाहतूक आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आणि उंच मूर्ती नेताना वाहनाची क्षमता, रस्त्याची स्थिती, गतिरोधक तसेच वीजवाहिन्या आणि इतर अडथळे यांची आधीच पाहणी करणे आवश्यक आहे.

कुर्ल्यातील घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी सलग घडलेल्या या घटनांमुळे गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उत्सवाचा आनंद कायम ठेवताना भक्तांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number