Krishna Janmashtami 2026 : कृष्ण जन्मला गं बाई…, कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीण, प्रियजनांना तसेच नातेवाईकांना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकतात. 

Krishna Janmashtami 2026 : कृष्ण जन्मला गं बाई…, कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता. या दिवशी अनेक भाविक दिवसभर उपवास करतात आणि मध्यरात्री बालकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करून पूजा-अर्चना करतात. यावेळी भगवान श्रीकृष्णाला माखन-मिश्री, पंजीरी, दूध, दही आणि फळांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

मंदिरांमध्ये विशेष आरत्या, भजन-कीर्तन आणि झुलोत्सवाचे आयोजन केले जाते. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीण, प्रियजनांना तसेच नातेवाईकांना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकतात. 

विष्णूचा अवतार तो करी दृष्टांचा नाश
कालिया नागाला केले नतमस्तक
कंस मामाचा केला संहार
कृष्ण आहे तो सर्वात बलवान
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
कृष्ण जन्मला अष्टमीला
देवकीच्या पोटी आज
आई झाली यशोदा
माया लावली तिने खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
धाची भक्ती, बासुरीची गोडी
लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास…
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
तुझा जन्म झाला, 
गोकुळ आनंदात नाहून निघाले, 
बासरीच्या सुरांनी अवघे विश्व वेडे झाले 
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
कान्हाच्या बाललीला पाहून दुःख सारं विसरून जावं 
जन्माष्टमीच्या पावन दिनी मुरली मनोहरच्या कृपेने 
जीवन संपूर्ण धन्य व्हावं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली,
कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number