मथुरा : देशभर जन्माष्टमी साजरी करण्यात आला. मथुरा आणि द्वारका येथे भगवान श्रीकृष्णाचा जन्माष्टमीचा सोहळा रंगला. या सोहळ्यात सोन्याने सजवलेल्या ‘कामधेनु’च्या साहाय्याने अभिषेक आणि 500 ड्रोन्सच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या ‘लीलां’चे सादरीकरण करण्यात आले. तसेच नाथद्वारा येथे 21 तोफांची सलामी देण्यात आली. शुक्रवारी देशभरातील मंदिरांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यात आली. मध्यरात्री मथुरा-वृंदावनपासून ते जगन्नाथ पुरी आणि द्वारकेपर्यंत विविध ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. भगवान श्रीकृष्णाची 5,253 वी जयंती साजरी करण्यात आली. मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी येथे, सोन्याने सजवलेल्या चांदीच्या ‘कामधेनु’च्या साहाय्याने भगवान श्रीकृष्णाला विधिवत स्नान घालण्यात आले. 500 ड्रोनच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग साकारले गेले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मथुरेतील या पवित्र स्थळाला 15 लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली होती. तसेच राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे देवतेला 21 तोफांची सलामी देण्यात आली.
#WATCH | Rajasthan: An idol of the infant form of Lord Krishna is bathed in milk to mark his birth, as hundreds of devotees gather to witness the celebrations on the occasion of Shri Krishna Janmashtami at the ISKCON Temple in Ajmer. pic.twitter.com/NRrSfMuqFQ — ANI (@ANI) September 4, 2026
तत्पूर्वी, मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर, दिल्लीतील इस्कॉन मंदिर आणि जयपूर येथील गोविंद देवजी मंदिरात मंगला आरती करण्यात आली. दरम्यान, बिहारमधील पाटणा येथील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णाचा 108 चांदीच्या पात्रांनी विधिवत अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या सजावटीसाठी विविध प्रकारची सुमारे 8 टन फुले मागवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त एका भव्य देखाव्याची निर्मिती करण्यात आली. या देखाव्याचे निर्माते श्याम सुंदर गुप्ता म्हणतात, “आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आम्ही दरवर्षी असा देखावा साकारतो. आज या उपक्रमाची 51 वर्षे पूर्ण झाली आहेत.”
#WATCH | Mumbai, Maharashtra: Devotees gather for the midnight prayers to celebrate the birth of Lord Krishna on the occasion of Shri Krishna Janmashtami at the ISKCON Temple in Chowpatty. pic.twitter.com/DMmTsys7cp — ANI (@ANI) September 4, 2026
येथे तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर, रामनगर किल्ला, केदारनाथ, वृंदावन, बांके बिहारी मंदिर, दिल्लीचा लाल किल्ला, अयोध्या किल्ला, दशरथ भवन आणि अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील. आम्ही हे अत्यंत भव्यतेने सजवतो. येथील तंत्रज्ञान विभागात रोप-वे आणि वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. मथुरेतील बांके बिहारी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीत मंगला आरती करण्यात आली. ही आरती वर्षातून केवळ एकदाच, म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने केली जाते. तसेच मुंबईतील इस्कॉन मंदिराही रात्री 12 वाजता श्री कृष्ण जन्माचा सोहळा अनुभवता आला.
#WATCH | Mathura, UP: Devotees gather for the midnight prayers to celebrate the birth of Lord Krishna on the occasion of Krishna Janmashtami at the Shri Krishna Janmabhoomi Temple. pic.twitter.com/bQ8cdChMn4 — ANI (@ANI) September 4, 2026