कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवबा संघटनेच्या या चार कार्यकर्त्यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला केला होता.

कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व खूनाच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. जनआक्रोशाची दखल घेत ह्या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर सुनावणी करण्यात आली. व त्यानंतर या प्रकरणातील दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version