जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
गेल्या काही दिवसांपासूंन कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. महापालिकेनs तब्बल 21 कोटी थकबाकी ठेवल्यामुळे पाटबंधारे विभागाने ही कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.
थकबाकीची रक्कम भरण्यासाठी पालिकेला 15 दिवसांची मुदत देण्यात आलीय. जिल्ह्यातल्या इतर शासकीय कार्यालयांचीही मोठी थकबाकी असल्याचं यानंतर उघडकीस आलंय.
पाणी पुरवठा बंद केल्यानंतर तरी पालिकेला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित झालाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.