Guldar Boat Sindhudurg : ‘गुलदार’ च्या रूपात कोकणातील पर्यटनाला नवी ओळख; निवृत्त युद्धनौकेतून जलपर्यटन

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथे देशातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू होत आहे. यामुळे सिंधुदुर्गात जागतिक दर्जाचे जलपर्यटन सुरू होत आहे.
Guldar Boat Sindhudurg : ‘गुलदार’ च्या रूपात कोकणातील पर्यटनाला नवी ओळख; निवृत्त युद्धनौकेतून जलपर्यटन

मालवण: कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथे देशातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू होत आहे. तब्बल सहा वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर ‘गुलदार’ ही सेवानिवृत्त युद्धनौका या प्रकल्पाच्या रूपात साकारली आहे. हे जहाज पोर्ट ब्लेअर येथून कारवार येथे आणण्याच आले. यानंतर निवती येथे आणले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन केंद्र बनणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्गातील निवतीजवळ समुद्र तळाशी देशातील पहिला अंडरवॉटर (पाण्याच्या खाली) संग्रहालय प्रकल्प सुरू करण्यात येत आहे, ज्यामध्ये निवृत्त युद्धनौका 'आयएनएस गुलदार' चा वापर केला आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आहे.

‘गुलदार’ नौकेला भेट
तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या या निवृत्त युद्धनौकेला नुकतीच भेट दिली. यावेळी सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, शुभम झाट्ये, मनोज खोबरकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार तसेच भारतीय नौदलाचे आभार मानले.

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठी पर्यटनातील नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याच्या जोडीला कौशल्य विकास आणि दर्जेदार संसाधनांची आवश्यकता होती. यासाठी अभ्यासकांनी प्रयत्न केले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया तारकर्ली विकास संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढा आणि जिंका 5 लाख! 'या' संकेतस्थळावर करा अपलोड

प्रकल्पाचे महत्त्व
रवींद्र खानविलकर म्हणाले की, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले. विशेषतः डॉ. सारंग कुलकर्णी, धीरज चोपडेकर, सूरज भोसले, घनश्याम मोरजे आणि संकेत गावडे यांच्या योगदानाचा त्यांनी गौरव केला. हा प्रकल्प कोकणातील पर्यटनाला अधिक सक्षम करेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – Mumbai Tourism : कोण म्हणतं फिरण्यासाठी खूप पैसे लागतात? मुंबईतल्या या ठिकाणी तुम्ही ‘शून्य’ रुपयांत फिरू शकता!

अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गात सी-वर्ल्ड, हाऊस बोट, आणि पाणबुडीसारखे मोठे पर्यटन प्रकल्प घोषित केले जात आहेत, परंतु त्यापैकी फार थोडे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे गुलदारच्या या प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्यात यश येईल की नाही, याबद्दल सावधगिरी बाळगली जात आहे. 
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवृत्त युद्धनौका 'आयएनएस गुलदार' चा वापर करून समुद्रात एक अद्वितीय अंडरवॉटर संग्रहालय बनवण्याचा प्रकल्प राबवला जात आहे, ज्यातून जलपर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. मात्र, असे प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच अनेकदा रखडलेले दिसतात, त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अनिश्चित आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version