जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 400 कोटींचा घोटाळा केलाप्रकरणी चौकशी सुरु असलेल्य़ा बाबा सिद्दीकी यांच्यावर किरीट सोमय्या यांनी हवाला मार्फत लंडन आणि इतर
देशात पैसा पाठवल्याचा आरोप केला आहे.
बाबा सिद्धीकी यांचे अनेक व्यवहार अपारदर्शक असून पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली.
याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच अंमलबजवाणी संचालनालयने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत.
दरम्यान, यातून काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.