Kiran Mane Post On Jahnavi Killekar Viral Video: "मराठी कलाकारांची जागा ‘रीलस्टार्स’नी घेतली" किरण माने यांनी पोस्टमधून व्यक्त केलं स्पष्ट मत

दहीहंडीच्या कार्यक्रमातील जान्हवी किल्लेकर आणि प्रणाली सूर्यवंशी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर किरण माने सोशल मीडियावर आपल्या परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Kiran Mane Post On Jahnavi Killekar Viral Video: &quotमराठी कलाकारांची जागा ‘रीलस्टार्स’नी घेतली&quot किरण माने यांनी पोस्टमधून व्यक्त केलं स्पष्ट मत

नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवातील अनेक गोष्टी वादाच्या भोवऱ्यात आल्या. तर दुसरीकडे दहीहंडी सोहळ्यातील आयोजित कार्यक्रमांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. दरम्यान यंदाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अशातच सोशल मीडियावर दहीहंडी सोहळ्याचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये दहीहंडीच्या एका कार्यक्रमात मराठीतली नावाजलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि रिलस्टार प्रणाली सूर्यवंशी एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळतंय. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी जान्हवी किल्लेकरपेक्षा रिलस्टार प्रणाली सूर्यवंशीला जास्त पसंती दाखवली.

याचपार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते, लेखक आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने सोशल मीडियावर आपल्या परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. किरण माने आपल्या रोखठोक भूमिकांसाठी नेहमीच ओळखले जातात. अशातच आता लोकांचा सेलिब्रिटींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, यावर किरण माने यांनी आपल्या पोस्टद्वारे भाष्य केलं आहे.

हेही वाचा- Waiter To Actor: सैफ-करीनाच्या लग्नात वेटर म्हणून काम, 225 रुपये पगार…आता बिग बॉस 20 मध्ये स्पर्धक, हा अभिनेता कोण?

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “बदलत्या काळाची पावलं ओळखता यायला हवीत.पूर्वी… अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत मराठीत सिनेमा-टीव्ही कलाकार म्हणजे सगळ्यात मोठे ‘सेलिब्रिटी’ मानले जायचे. आज ती जागा ‘रीलस्टार्स’नी घेतली आहे.
हल्ली लोकांना सिनेकलाकारांपेक्षा रीलस्टार्सचे डायलॉग ऐकायचे असतात. रीलस्टार्सना बघायचं असतं. दहीहंडीसारख्या कार्यक्रमांना मराठी कलाकारांपेक्षा रीलस्टार्स, टीव्ही-सिनेमाच्या हिरोइन्सपेक्षा गौतमीसारखे डान्सर्स जास्त मानधन घेऊ लागलेत.
नांदेड सिटीच्या दहीहंडी कार्यक्रमात आमच्या ‘बिग बॉस’ फेम जान्हवीपेक्षा लोकांना रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीचं जास्त अप्रूप होतं… हे एक प्रातिनिधिक उदाहरण !
हे योग्य आहे की अयोग्य — या चर्चा होत रहातील. कोण म्हणेल मराठी कलाकारांचा आणि कलाकृतीच्या विषयांचा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या जगण्याशी ‘कनेक्ट’ नाही. कोण म्हणेल हल्ली जेन झी मराठी सिरियल सिनेमे बघतच नाही. कोण म्हणेल सुमारांची सद्दी.. पण या चर्चा भाकड आहेत. त्याने परिस्थिती बदलणार नाही. काळ बदलतोय. लोकांचे ‘चॉईसेस’ बदलतायत. विशेषतः मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलं गेलं आहे. कारणं अनेक असतील. पण जे आहे, ते आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number