वृत्तसंस्था, चेन्नई
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने मोठा झटका दिला आहे. मनी लॉन्ड्रिग प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना अटक केली आहे.
बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांचे सीए एस. भास्कररमन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
आयएनएक्स मीडियाप्रकरणी भास्कररमन यांना अटक करण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.