जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
थंडीचा कडाका राज्यभर सर्वत्रच वाढलेला आहे. मात्र, याच वाढत्या धुक्यामुळे कर्जत-पुणे-कर्जत ही पॅसेंजर गाडी उद्या आणि गुरुवारी रद्द करण्यात आलीय.
मुंबई मंडळात धुक्याचे प्रमाण वाढलंय. यामुळे पुणे-कर्जत मार्गावर धावणा-या दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 11.15 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 51318 पुणे-कर्जत पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आलीय.
तसेच कर्जत रेल्वे स्थानकावरून दुपारी 03.10 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 51317 कर्जत-पुणे पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.
रेल्वेकडून होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन भारतीय रेल पुणे विभाग कडून करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.